Posts

Showing posts from 2022

डी. के. ए. एस. सी. कॉलेज मध्ये वनस्पती विभागात संविधान दिन साजरा

Image
*डी. के. ए. एस. सी. कॉलेज मध्ये वनस्पती शास्त्र  विभागात संविधान दिन साजरा* इचलकरंजी येथे डी. के. ए. एस. सी. कॉलेज मध्ये वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने संविधान दिन खुप उत्साहाने साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. टी इंगळे यांनी संविधान दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले,तसेच संविधानाचे निर्माते भारतीय राज्यघटनेचे * शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर * यांनी संविधान निर्मितीसाठी केलेल्या कार्याची माहिती सांगितली. भारत हा धर्मनिरपेक्ष, सार्वभौम, समाजवादी देश आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा विविध भाषा, विविध धर्म, विविध संस्कृती असणारा देश असूनही भारतीय संविधानामुळे तो आजही एकसंघ आणि एकात्म राहिलेला आहे. स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय ही मुलतत्वे भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आहेत. भारतातील प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि समान न्याय भारतीय संविधानाने दिलेले आहे. तसेच कुठल्याही प्रकारची विषमता आणि असमानता भारतीय संविधानाला मान्य नाही, आपण सर्व प्रथम भारतीय व अंतिमतः भारतीयच असू ही शिकवण घटनेच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब ...

वनस्पतीशास्त्र विभागात नवागतांचे (एम्. एस्सी. भाग 1 आणि बी.एस्सी. भाग 3) स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात

Image
 * वनस्पतीशास्त्र विभाग, दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स अॅन्ड् काॅमर्स काॅलेज इचलकरंजी* दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स and काॅमर्स काॅलेज इचलकरंजी वनस्पतीशास्त्र विभागात नवागतांचे (एम्. एस्सी. भाग 1  आणि बी.एस्सी. भाग 3) स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. स्वागत समारंभास प्रमुख पाहुणे आपल्या काॅलेज  उपप्राचार्य श्री. डी. ए. यादव सर, अध्यक्ष स्थानी विभागप्रमुख डाॅ. एस्. टी. इंगळे सर, प्रमुख उपस्थिती श्री. बाळासाहेब पाटील उद्योजक, संपुर्ण जीवन फार्मा इंडस्ट्रीज यांची उपस्थिती लाभली. समारंभास आपल्या काॅलेज चे लाडके प्राचार्य डॉ. अनिल पाटील सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. समारंभ दरम्यान श्री. यादव सर व डाॅ. इंगळे यांनी विद्यार्थी विद्यार्थीनींना आपल्या काॅलेज ची माहिती दिली व मार्गदर्शन केले. एम्. एस्सी. भाग 1  आणि बी.एस्सी. भाग 3, एम्. एस्सी. भाग 2 शिक्षण पुर्ण झाले ल्या माजी विद्यार्थी विद्यार्थीनी चा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थी  विद्यार्थीनी नी आपली मनोगतं मांडली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. लक्ष्मी बदामे व कु. सोनाली...

रानभाज्या महोत्सव व पाककृती स्पर्धा-२०२२-२०२३

Image
  रानभाज्या महोत्सव व पाककृती स्पर्धा-२०२२-२०२३ दि. २७-९-२०२२  दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड़ काँमर्स कॉलेज इचलकरंजी, वनस्पतीशास्त्र विभागाअंतर्गत रानभाज्या पाककृती महोत्सवाचे आयोजन करणेत आले होते. बी. एस्सी व एम. एस्सी तील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या रान भाज्यांपासून केलेल्या पाककृती सादर केल्या.ह्या एक दिवसीय कार्यक्रमाची सुरवात सकाळी उदघाटन सत्राने झाली. उदघाटन सत्रासाठी प्रमुख पाहुणे मा.बाजीराव वासुदेव हे उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुपार सत्राचे प्रभारी प्रा. डी. ए. यादव हे उपस्थित होते.कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून डॉ. रुपाली सांभारे व डॉ. अंजली उबाळे यांनी परिक्षण केले.या वेळी वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. टी. इंगळे यांनी रानभाज्यांची माहिती व उपयुक्तता विषद केली.    या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. पूर्वा पाटील व कु. साया सय्यद यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. एम. वाय. शिंदे यांनी केले. या एकदिवसीय कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी भेट देवून उत्स्फुर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या कार्यक्र...

वनस्पतीशास्त्र विभागात 'Know Our today's plant' कार्यक्रमाचे आयोजन

Image
 *दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स अॅन्ड् काॅमर्स काॅलेज च्या  वनस्पतीशास्त्र विभागात 'Know Our today's plant' कार्यक्रमाचे आयोजन* इचलकरंजी: येथील दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स अॅन्ड् काॅमर्स काॅलेज इचलकरंजी, वनस्पतीशास्ञ विभागाच्यावतीने वनस्पतीशास्त्र विषयाच्या विद्यार्थी विद्यार्थीनी ना वनस्पती ची ओळख व माहिती मिळावी ह्या उद्देशाने  *'Know our today's plant* हा उपक्रम सुरु करण्यात आला. ह्या उपक्रमाचे आयोजन आपल्या काॅलेज चे प्राचार्य माननीय डाॅ. अनिल पाटील सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रम विषयी प्रस्तावना व Dillenia indica (मोठा करमळ) या वनस्पती विषयी माहिती वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डाॅ. सुभाष इंगळे यांनी दिली. मा. प्राचार्य सर यांनी सदर च्या उपक्रम चे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे औचित्य साधून विभागाच्यावतीने मा. प्राचार्य सर यांना रोटरी क्लब तर्फे नेशन बिल्डर पुरस्कार मिळाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमला वनस्पतीशास्त्र विभागाचे डाॅ. मधुमती शिंदे, सौ. भारती दोपारे, डाॅ. आम्रपाली कट्टी, डाॅ. वर्षा दवंडे, ...

Celebration of Earth Day

Image
 Celebration of Earth Day P.G. Department of Botany celebrated Earth day on 25 th April 2022. On this day Dr. S. T. Ingle, Head of Botany, shared the importance of Earth and related issues with students. The department has organised floral decoration compitition on this day. All students from M.Sc.I and M.Sc.II actively participated in the compitition and also donated plants to Department. Dr. V. R. Dawande and Dr. L. M. Khade organised the program successfully.

वनस्पतीशास्ञ विभागामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त व्याख्यानाचे आजोजन

Image
 * वनस्पतीशास्ञ विभागामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त व्याख्यानाचे आजोजन* 🌻🌱🌻🌱🌻🌱🌻🌱 इचलकरंजी   - येथील डी. के. ए. एस. सी.कॉलेजमध्ये *राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त* वनस्पतीशास्त्र विभाग ,सायन्स असोसिएशन व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्यावतीने *प्रा.शेखर ए.मोहिते सर* यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  यावेळी बोलताना प्रा.शेखर मोहिते म्हणाले ,“UNESCO World Natural Heritage Site”समाविष्ट असे *कास पठार* विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. येथील जैवविविधता व पठारावर फुलणाऱ्या दुर्मीळ फुलांना टिकवायचे असेल तर कास पठाराचे संवर्धन होणे गरजेचे आहे.त्याचे सखोल शास्त्रीय संशोधन आणि डोळस संरक्षण व्हायला हवे. अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य *डॉ. व्ही.एस.ढेकळे* यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,तसेच कास पठार हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे व त्याचे संवर्धन करणे आपणा सर्वांचे कर्त्यव्य आहे,असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांचा परिचय वनस्पती शास्ञ विभागप्रमुख डॉ.एस्. टी.इंगळे यांनी करून दिल...

Birth Anniversary of charles Darwin

Image
 चार्ल्स् डार्विन उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आजच्या पिढीलाही मार्गदर्शक- प्रा. डॉ. बी. टी दांगट  इचलकरंजी दिनांक 12 फेब्रुवारी  चार्ल्स् डार्विन हे महान वैज्ञानिक भूगर्भशास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ असून त्यांनी 1858 साली दिलेला उत्क्रांतिवादाचा सिधान्त् जगातील आजच्या नवीन पिढीला उपयुक्त आहे असे विचार प्रा. बी. टी. दांगट विभाग प्रमुख विवेकानंद कॉलेज कोल्हापूर यांनी दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेज इचलकरंजी येथील कार्यक्रमात व्यक्त केले. ते चार्ल्स डार्विन यांच्या जयंती समारोह निमित्त आभासी पद्धतीने केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. एस. ढेकळे सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष इंगळे सर यांनी केले. या कार्यक्रमात दांगट पुढे म्हणाले डार्विन यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 मध्ये झाला असून त्यांना निसर्गाबद्दल मोठे आकर्षण होते. बालपनि  सर्वसामान्य सारखें असणारै डार्विन् यानी दिलेला महान उत्क्रांतिवादाचा सिद्धांत  'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' आजही ल...

world Wet Land Day on 2 nd February 2022

Image
P. G. Department of Botany organized world Wet Land Day on 2 nd February 2022.  The theme of the day was Wetlands Action for People and Nature.  The session was chaired by Dr.S.T.Ingle ( H.O.D. Dept. Of Botany). Students from M.Sc.I  and M.Sc.II year actively participated by sharing their views about the theme of the day. Miss. Shubhangi Kurade, Miss. Tanmaya Kumbhar and miss Shruti Khot were the student speakers. They explained the importance of wetlands and it's conservation. Dr.S.T.Ingle and Dr. S.N.Dhumal shared their thoughts and provided guidance to students. Dr. V.R.Dawande and Dr. L.M Khade also contributed their knowledge and guided students. Vote of thanks were delivered by Dr.L.M.Khade. All faculty members and students from P.G.Dept.Of Botany were attended the function.

Bonsai-An Art of Living डी.के.ए.एस.सी. मध्ये वनस्पतीशास्त्र विभागाची ऑनलाइन कार्यशाळा संपन्न

Image
  डी.के.ए.एस.सी. मध्ये  वनस्पतीशास्त्र विभागाची ऑनलाइन कार्यशाळा संपन्न

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भित्तीपत्रक प्रदर्शन

Image
  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भित्तीपत्रक प्रदर्शन