क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भित्तीपत्रक प्रदर्शन

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भित्तीपत्रक प्रदर्शन


इचलकरंजी - येथील दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स अॅन्ड् कॉमर्स कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वनस्पतीशास्त्र विभागात ‘कर्तृत्ववान महिला’ या विषयावर भित्तीपत्रक प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस्. टी. इंगळे सर तर, प्रमुख पाहुण्या म्हणून प्राणीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. पी. के. वाघमारे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. इंगळे सर यांनी आपल्या प्रास्ताविकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली. डॉ. वाघमारे मॅडम यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनिंना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याचे विचार आचरणात आणण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सर्वांनी भित्तीपत्रकाचे वाचन केले व कर्तृत्ववान महिला च्या विषयी माहिती जाणून घेतली. सर्व मान्यवरांचे स्वागत व प्रास्तविक डॉ. एम. वाय. शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूञसंचालन विद्यार्थिनी मशिरा तहसिलदार हिने केले तर डॉ. एस्. के. गावडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विभागातील  प्राध्यापिका डॉ. एम. वाय. शिंदे , डॉ. ए. व्ही. कट्टी ,कु.आरती खोत, सौ.दोपारे,सौ.उर्मिला चौगुले.आणि विद्यार्थी,  विद्यार्थिनी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस्. ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन केले होते.









Comments

  1. Nice activity.... Through this activity.... Students will understand the story of struggle done by savitribai phule for girl education..... It is a nice event

    ReplyDelete
  2. So good👌👌. Posters are so creative and attractive.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Online Teachers day