*वनस्पतीशास्त्र विभागात ५ डिसेंबर -'जागतिक मृदा दिन' साजरा*
माती हा आरोग्यदायक अन्ननिर्मितीचा पाया आणि संवर्धनाची गरज लक्षात घेऊन ५ डिसेंबर जागतिक मृदा दिनाचे औचीत्य साधुन डीकेएएससी महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.जमीन हा मर्यादित स्वरूपाचा नैसर्गिक स्रोत असल्यामुळे त्याची योग्य जोपासना करून भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे,असे मत प्रो.डॉ.एस्.एस्.कांबळे शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मांडली.तसेच या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणूनडॉ.व्ही.बी.शिंपले वनस्पतीशास्ञ विभाग दि न्यू कॉलेज कोल्हापूर होते. अध्यक्षस्थानी असलेले विभागप्रमुख डॉ.व्ही.ए. पाटील यांनी माती परीक्षणाचे महत्व व फायदे,तसेच जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने चला तर मग, स्वतःला जपण्यासाठी मृदेलाही जपूया असे वक्तव्य केले .जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड, माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर, पिकांची फेरपालट, सेंद्रिय खतांचा नियमित वापर, इत्यादींचा वापर करुन जमिनीची सुपिकता टिकवुन ठेवणे,यासाठी वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी प्रा.मधुमती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या माती परीक्षण प्रकल्पाचे सादरीकरण ही करण्यात आले.विद्यार्थ्यांनी इचलकरंजी परिसरातील *खोतवाडी* येथील शेतजमिनीतून विविध प्रकारची मृदा संग्रहित करून परीक्षण केले.
स्वागत कु.आरती गायकवाड तसेच प्रास्तविक प्रा.मधुमती शिंदे यांनी केलं.व प्रा.एस्.टी.इंगळे यांनी आभार मानले. यावेळीप्रा.दोपारे, प्रा.कट्टी, प्रा.खोत, प्रा.धुमाळ, प्रा.खाडे , प्रा.दवंडे तसेच वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Excellent
ReplyDeleteSoil is imp part of our life ..and healthy soil is imp for healthy life ...thats why celebration of soil day is best and nice activity done by botany dept ...
ReplyDeleteIt's an excellent program by department.... It gives extra knowledge
ReplyDeleteIt's an excellent program by department.... It gives extra knowledge
ReplyDeleteThank you for comments all memmembe
ReplyDeletenice keep it up
ReplyDeleteAlways supportive department
ReplyDelete