एम्. एस्सी. भाग १ स्वागत समारंभ आणि एम्. एस्सी. भाग २ चा निरोप समारंभ
वनस्पतीशास्त्र विभागात नवागतांचे एम्. एस्सी. भाग १ स्वागत समारंभ आणि एम्. एस्सी. भाग २ चा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात
दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स and काॅमर्स काॅलेज इचलकरंजी वनस्पतीशास्त्र विभागात नवागतांचे स्वागत समारंभ व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. स्वागत समारंभास प्रमुख पाहुणे आपल्या काॅलेज प्राचार्य डॉ.अनिल पाटील सर,उपप्राचार्य श्री. डी. ए. यादव सर, अध्यक्ष स्थानी विभागप्रमुख डाॅ. एस्. टी. इंगळे सर यांची उपस्थिती लाभली. समारंभास आपल्या काॅलेज चे लाडके प्राचार्य डॉ. अनिल पाटील सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. समारंभ दरम्यान श्री. यादव सर व डाॅ. इंगळे यांनी विद्यार्थी विद्यार्थीनींना आपल्या काॅलेज ची माहिती दिली व मार्गदर्शन केले. एम्. एस्सी. भाग 1 आणि बएम्. एस्सी. भाग 2 शिक्षण पुर्ण झालेल्या माजी विद्यार्थी विद्यार्थीनी चा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थीनींनी आपली मनोगतं मांडली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. श्रद्धा पाटील व कु. जान्हवी शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन करु.पौर्णिमा पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ.वर्षा दवंडे,डाॅ. लीना खाडे, डॉ. संदिप गावडे,डाॅ. मधुमती शिंदे, प्रा. सौ. भारती दोपारे, डॉ. आम्रपाली कट्टी, प्रा. आरती खोत, डॉ. केतकी पाटील, डॉ.चिराग नारायणकर , डॉ.सारीका पाटील उपस्थित होते.श्री.संभाजी कोळी आणि श्री.सुनिल कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment