*वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने विशेष क्षेत्रभेट व अभ्यास पर्यटन उत्साहात*
डिकेएएससी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने इस्लामपूर-तळसंदे-किल्ले पन्हाळागड येथे विशेष क्षेत्रभेट व अभ्यास पर्यटनाचे आयोजन केले होते. *इस्लामपूर* मधील *सिद्धांत जाधव यांनी उभारलेल्या"गीता मारुती नॅचरल फूड्स"* ला भेट दिली.सिद्धांत जाधव हे छोट्याश्या जागेत Algae(शेवाळ) spirulina पासून टॅबलेट निर्मिती करतात.या टॅबलेट प्रोटीनयुक्त असून याचा वापर जनावरांचे,दूध वाढ,कच्चे व चांगले अन्न म्हणून दैनंदिन आहारात वापरतात. Alage(शेवाळ) सातत्याने वाढत असते.त्याचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते.यातून निर्मिती होणाऱ्या टॅबलेट मध्ये कॅलरी,कॅल्शिअम, प्रोटीन अधिक प्रमाणात मिळते. त्यामुळे दैनंदिन मानवी जीवन आरोयदायी बनते.असे मत सिद्धांत जाधव यांनी व्यक्त केले.यानंतर *तळसंदे येथील विश्वास चव्हाण यांच्या "सीमा बायोटेक "ला भेट दिली.* विश्वास चव्हाण ७एकर मध्ये १५० कामगारांच्या मदतीने केळी, साग अशा विविध रोपांची निर्मिती करतात.या बायोटेक चे व्यवस्थापक श्री. धुमाळ यांनी या क्षेत्राची विस्तृत माहिती दिली.प्रथम त्यांनी Tissue culture या आधुनिक पद्धतीने करत असलेल्या केली रोपाची प्रयोगशाळा दाखवून सविस्तर माहिती दिली व केळी रोपाची निर्मिती होत असताना केल्या जाणाऱ्या विविध प्रकिया यांविषयी सांगितले. या रोपांची मागणी देशभरात २२जिल्हे व६राज्यात असून ८०%नियमित ग्राहक असल्याचे ही त्यांनी सांगितले. दरवर्षी दक्षिण भारतात येथून ५ लाख सागाची रोपे ही पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच "Sweatcorn"चे दाने पुनःप्रकिया करून दररोज 6 टॅन उत्पादित करत असल्याचे व्यवस्थापक धुमाळ यांनी सांगितले.
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी पन्हाळा गडावरील तबक उद्यान, नेहरू उद्यान,पन्हाळा गड या ठिकाणी Alage, fungi, bryophyte,Pteridophyte यांसारख्या विविध प्रजातींचे निरीक्षण करून संकलन विद्यार्थ्यांनी केले.यावेळी
प्रा.डॉ. व्ही. ए. पाटील,प्रा.मधुमती शिंदे, प्रा.आरती खोत प्रा.आम्रपाली कट्टी यांनी अभ्यास पर्यटनामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Great work
ReplyDeleteExcellent visit
ReplyDeleteNice experience.. With lot of knowledge
ReplyDeleteNice experience.. With lot of knowledge
ReplyDeleteGood Job
ReplyDeleteFrom-Sagar Kadam
Niceee
ReplyDelete