वनस्पतीशास्त्र विभागातर्फे बालिका दिन व सावित्रीबाई फुले जयंती साजरी
*वनस्पतीशास्त्र विभागातर्फे बालिका दिन व सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
वनस्पती शास्त्र विभागातर्फे बालिका दिन आणि सावित्रीबाई फुले जयंती याचे औचित्य साधून *स्त्री पुरुष समानता आणि आपले संविधान* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते मा. श्री विनायक माळी एनजीओ मुक्तांगण विद्योदय परिवार, अब्दुल लाट. यांनी स्त्री पुरुष समानता आणि आपले संविधान या विषयावर ओघवती व सर्वसमावेशक अशी मुक्त चर्चा केली. तसेच अध्यक्षस्थानी डी. के. ए. एसी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर सर होते. तसेच प्रमुख पाहुणे मा. डॉ. एस. टी. इंगळे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी. एस. दोपारे आणि कु. गायत्री साळुंखे यांनी केले. तसेच आभार डॉ. सुरेखा धुमाळ यांनी मांडले.या कार्यक्रमात बीएससी भाग एक, दोन आणि तीन यामधील विद्यार्थी तसेच वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment