"भरडधान्य पाक-कला प्रदर्शन"

 *"भरडधान्य पाक-कला प्रदर्शन"*


श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे, दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्य ॲण्ड कॉमर्स कॉलेज इंचलकरजी येथे वनस्पतीशास्त्रा विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी "भरडधान्य पाककला प्रदर्शन" घेण्यात आले. या मध्ये मुलांना  भरडधान्याची  ओळख व्हावी व त्यांचे महत्व समजावे म्हणून बाजरी, नाचणी,रागी, राळे, वरी यापासून पारंपारिक व आधुनिक काही पाककृती  समजाव्यात यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुण्या सौ. मोशमी आवाडे व सौ. अस्मीता आमणे यांनी मुलांचे कौतुक करत त्यांना भविष्यासाठी मार्गदर्शन केले व भरडधान्य चे महत्व त्यांच्या मनात रुजवले. त्याचबरोबर महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अनिल  पाटील सर यांनी ही मुलाचे कौतूक केले व शुभेच्छा दिल्या.वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व सहकार्यांचे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.  सर्व विद्यार्थ्यांनी 75 पाककृती करून छान छान आकर्षक सजावट करून ठेवल्या होत्या. या कार्यक्रमाचे संयोजक व विभागप्रमुख डॉ. सुभाष इंगळे सर यांनी केले.  सुत्रसंचालन डॉ. मधुमती शिंदे व कु. आरती खोत यांनी केले व आभार कार्यक्रमाचे समन्वक व आभार डॉ. आम्रपाली कट्टी यांनी केले.

 *"भरडधान्य पाक-कला प्रदर्शन"*







Comments

Popular posts from this blog

Birth Anniversary of charles Darwin