Bonsai-An Art of Living डी.के.ए.एस.सी. मध्ये वनस्पतीशास्त्र विभागाची ऑनलाइन कार्यशाळा संपन्न
डी.के.ए.एस.सी. मध्ये वनस्पतीशास्त्र विभागाची ऑनलाइन कार्यशाळा संपन्न
इचलकरंजी -येथील डी. के. ए.एस.सी.महाविद्यालयाच्या
वनस्पतीशास्ञ विभागाच्यावतीने अग्रणी महाविद्यालययोजने अंतर्गत *'Bonsai :An Art of Living'* या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत प्रा. डॉ.धनश्री पाटील यांनी व्याख्यान देऊन प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले. प्रा.धनश्री पाटील कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना म्हणाल्या, *बोन्साय कलेला मोठी संधी आहे. यातून रोजगारही निर्माण होऊ शकतो. प्रशिक्षण दिल्यास रोजगाराची हमी देता येऊ शकते.*
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे होते.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ वनस्पतीशास्ञ विभागप्रमुख प्रा.व्ही.डी.जाधव होत्या. पाहुण्यांचा परिचय वनस्पतीशास्ञ विभागप्रमुख डॉ.एस्.टी.इंगळे.यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविककार्यशाळेच्या संयोजिका डॉ.एम्.वाय्.शिंदे यांनी केले. आभार डॉ.एस्.के. गावडे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी वनस्पतीशास्ञ विभागातील प्राध्यापिका डॉ. ए. व्ही. कट्टी ,कु.आरती खोत, सौ.दोपारे,सौ.उर्मिला चौगुले
उपस्थित होते.कार्यक्रमात या कार्यशाळेत क्लस्टर अंतर्गत महाविद्यालया तील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
खुप सुंदर असे आहे ....
ReplyDelete