वनस्पतीशास्त्र विभागात 'Know Our today's plant' कार्यक्रमाचे आयोजन

 *दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स अॅन्ड् काॅमर्स काॅलेज च्या  वनस्पतीशास्त्र विभागात 'Know Our today's plant' कार्यक्रमाचे आयोजन*

इचलकरंजी: येथील दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स अॅन्ड् काॅमर्स काॅलेज इचलकरंजी,



वनस्पतीशास्ञ विभागाच्यावतीने वनस्पतीशास्त्र विषयाच्या विद्यार्थी विद्यार्थीनी ना वनस्पती ची ओळख व माहिती मिळावी ह्या उद्देशाने  *'Know our today's plant* हा उपक्रम सुरु करण्यात आला. ह्या उपक्रमाचे आयोजन आपल्या काॅलेज चे प्राचार्य माननीय डाॅ. अनिल पाटील सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रम विषयी प्रस्तावना व Dillenia indica (मोठा करमळ) या वनस्पती विषयी माहिती वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डाॅ. सुभाष इंगळे यांनी दिली. मा. प्राचार्य सर यांनी सदर च्या उपक्रम चे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे औचित्य साधून विभागाच्यावतीने मा. प्राचार्य सर यांना रोटरी क्लब तर्फे नेशन बिल्डर पुरस्कार मिळाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमला वनस्पतीशास्त्र विभागाचे डाॅ. मधुमती शिंदे, सौ. भारती दोपारे, डाॅ. आम्रपाली कट्टी, डाॅ. वर्षा दवंडे, डाॅ. लीना खाडे, आरती खोत, उर्मिला चौगुले, डाॅ. उदयसिंह देसाई आणि डाॅ. संदिप गावडे तसेच बी.एस्सी. भाग 3 व एम्. एस्सी. चे विद्यार्थी विद्यार्थीनी  उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

Online Teachers day