रानभाज्या महोत्सव व पाककृती स्पर्धा-२०२२-२०२३

 रानभाज्या महोत्सव व पाककृती स्पर्धा-२०२२-२०२३

दि. २७-९-२०२२ 

दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड़ काँमर्स कॉलेज इचलकरंजी, वनस्पतीशास्त्र विभागाअंतर्गत रानभाज्या पाककृती महोत्सवाचे आयोजन करणेत आले होते. बी. एस्सी व एम. एस्सी तील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या रान भाज्यांपासून केलेल्या पाककृती सादर केल्या.ह्या एक दिवसीय कार्यक्रमाची सुरवात सकाळी उदघाटन सत्राने झाली. उदघाटन सत्रासाठी प्रमुख पाहुणे मा.बाजीराव वासुदेव हे उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुपार सत्राचे प्रभारी प्रा. डी. ए. यादव हे उपस्थित होते.कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून डॉ. रुपाली सांभारे व डॉ. अंजली उबाळे यांनी परिक्षण केले.या वेळी वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. टी. इंगळे यांनी रानभाज्यांची माहिती व उपयुक्तता विषद केली.


 


 या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. पूर्वा पाटील व कु. साया सय्यद यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. एम. वाय. शिंदे यांनी केले. या एकदिवसीय कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी भेट देवून उत्स्फुर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या कार्यक्रमासाठी प्रा. सौ. बी. एस. दोपारे, डॉ. ए. व्ही. कट्टी, प्रा. ए, एस. खोत, डॉ. एस. के. गावडे, प्रा. यु. व्ही. चौगुले, डॉ. यु. ए. देसाई, श्री बी. बी. देसाई, श्री व्ही. एस. जोग, एस. एम कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.



Comments

Popular posts from this blog

Online Teachers day