डी. के. ए. एस. सी. कॉलेज मध्ये वनस्पती विभागात संविधान दिन साजरा
*डी. के. ए. एस. सी. कॉलेज मध्ये वनस्पतीशास्त्र विभागात संविधान दिन साजरा*
इचलकरंजी येथे डी. के. ए. एस. सी. कॉलेज मध्ये वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने संविधान दिन खुप उत्साहाने साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. टी इंगळे यांनी संविधान दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले,तसेच संविधानाचे निर्माते भारतीय राज्यघटनेचे *शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांनी संविधान निर्मितीसाठी केलेल्या कार्याची माहिती सांगितली. भारत हा धर्मनिरपेक्ष, सार्वभौम, समाजवादी देश आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा विविध भाषा, विविध धर्म, विविध संस्कृती असणारा देश असूनही भारतीय संविधानामुळे तो आजही एकसंघ आणि एकात्म राहिलेला आहे. स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय ही मुलतत्वे भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आहेत. भारतातील प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि समान न्याय भारतीय संविधानाने दिलेले आहे. तसेच कुठल्याही प्रकारची विषमता आणि असमानता भारतीय संविधानाला मान्य नाही, आपण सर्व प्रथम भारतीय व अंतिमतः भारतीयच असू ही शिकवण घटनेच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. म्हणून आपण त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करतो.संविधानाविषयी सर्व विद्यार्थ्यांमध्ये जाणीव व जागृती निर्माण व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो असे प्रतिपादन प्रा. डॉ. इंगळे सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु श्रुती खोत या विद्यार्थिनीने केले. या कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन डॉ. संदीप गावडे यांनी केले आणि आभार कु पूर्णिमा पाटील या विद्यार्थिनीने केले. सदर कार्यक्रमास वनस्पती शास्त्र विभागातील शिक्षक प्रा. सौ भारती डोपारे, डॉ. मधुमती शिंदे, डॉ. आम्रपाली कट्टी, प्रा. उर्मिला चौगुले, प्रा. आरती खोत, प्रा दवंडे मॅडम, डॉ. उदयसिंग देसाई व शिक्षकेत्तर कर्मचारी मा. भरत देसाई, सुनील कांबळे, मा. जोग व विभागातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होते.
Nice madam
ReplyDelete