Birth Anniversary of charles Darwin
चार्ल्स् डार्विन उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आजच्या पिढीलाही मार्गदर्शक- प्रा. डॉ. बी. टी दांगट इचलकरंजी दिनांक 12 फेब्रुवारी चार्ल्स् डार्विन हे महान वैज्ञानिक भूगर्भशास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ असून त्यांनी 1858 साली दिलेला उत्क्रांतिवादाचा सिधान्त् जगातील आजच्या नवीन पिढीला उपयुक्त आहे असे विचार प्रा. बी. टी. दांगट विभाग प्रमुख विवेकानंद कॉलेज कोल्हापूर यांनी दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेज इचलकरंजी येथील कार्यक्रमात व्यक्त केले. ते चार्ल्स डार्विन यांच्या जयंती समारोह निमित्त आभासी पद्धतीने केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. एस. ढेकळे सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष इंगळे सर यांनी केले. या कार्यक्रमात दांगट पुढे म्हणाले डार्विन यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 मध्ये झाला असून त्यांना निसर्गाबद्दल मोठे आकर्षण होते. बालपनि सर्वसामान्य सारखें असणारै डार्विन् यानी दिलेला महान उत्क्रांतिवादाचा सिद्धांत 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' आजही लागू पडत आहे. त्यांनी लिहिलेले 'ओरिजिन ऑफ स्पेसिज' हे पुस्तक आजचे बायबल किंवा भागवत गीता समजल्यास अतिशयोक्ती होणार नाही. त्यांनी मांडलेला सिद्धांत जगासाठी मार्गदर्शक आहे .त्यामुळेच त्यांची जयंती जगभरामध्ये वैज्ञानिक विश्वात् साजरी केली जाते .या कार्यक्रमात प्रा. डॉ. व्ही.एस.ढेकळे सर यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने एम एस सी व बी एस सी मधील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते . या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. वर्षा दवंडे व डॉ. लीना खाडे यांनी केले. शेवटी प्रा. डॉ. सुरेखा धुमाळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment