Posts

Showing posts from 2023

"भरडधान्य पाक-कला प्रदर्शन"

Image
 *"भरडधान्य पाक-कला प्रदर्शन"* श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे, दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्य ॲण्ड कॉमर्स कॉलेज इंचलकरजी येथे वनस्पतीशास्त्रा विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी "भरडधान्य पाककला प्रदर्शन" घेण्यात आले. या मध्ये मुलांना  भरडधान्याची  ओळख व्हावी व त्यांचे महत्व समजावे म्हणून बाजरी, नाचणी,रागी, राळे, वरी यापासून पारंपारिक व आधुनिक काही पाककृती  समजाव्यात यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुण्या सौ. मोशमी आवाडे व सौ. अस्मीता आमणे यांनी मुलांचे कौतुक करत त्यांना भविष्यासाठी मार्गदर्शन केले व भरडधान्य चे महत्व त्यांच्या मनात रुजवले. त्याचबरोबर महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अनिल  पाटील सर यांनी ही मुलाचे कौतूक केले व शुभेच्छा दिल्या.वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व सहकार्यांचे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.  सर्व विद्यार्थ्यांनी 75 पाककृती करून छान छान आकर्षक सजावट करून ठेवल्या होत्या. या कार्यक्रमाचे संयोजक व विभागप्रमुख डॉ. सुभाष इंगळे सर यांनी केले.  सुत्रसंचालन डॉ. मधुमती शिंदे व कु. आरती खोत यांनी केले व आभार कार्यक्र

एम्. एस्सी. भाग १ स्वागत समारंभ आणि एम्. एस्सी. भाग २ चा निरोप समारंभ

Image
वनस्पतीशास्त्र विभागात नवागतांचे एम्. एस्सी. भाग १ स्वागत समारंभ आणि एम्. एस्सी. भाग २ चा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स and काॅमर्स काॅलेज इचलकरंजी वनस्पतीशास्त्र विभागात नवागतांचे  स्वागत समारंभ व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. स्वागत समारंभास प्रमुख पाहुणे आपल्या काॅलेज प्राचार्य डॉ.अनिल पाटील सर,उपप्राचार्य श्री. डी. ए. यादव सर, अध्यक्ष स्थानी विभागप्रमुख डाॅ. एस्. टी. इंगळे सर यांची उपस्थिती लाभली. समारंभास आपल्या काॅलेज चे लाडके प्राचार्य डॉ. अनिल पाटील सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. समारंभ दरम्यान श्री. यादव सर व डाॅ. इंगळे यांनी विद्यार्थी विद्यार्थीनींना आपल्या काॅलेज ची माहिती दिली व मार्गदर्शन केले. एम्. एस्सी. भाग 1  आणि बएम्. एस्सी. भाग 2 शिक्षण पुर्ण झालेल्या माजी विद्यार्थी विद्यार्थीनी चा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थी  विद्यार्थीनींनी आपली मनोगतं मांडली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. श्रद्धा पाटील व कु. जान्हवी शिंदे  यांनी केले. आभार प्रदर्शन करु.पौर्णिमा पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ

वनस्पतिशास्त्र विभाग आयोजित एकदिवसीय कार्यशाळा*

Image
  वनस्पतिशास्त्र विभाग आयोजित एकदिवसीय कार्यशाळा दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स व कॉमर्स कॉलेज इचलकरंजी येथे वनस्पतिशास्त्र विभागातर्फे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले होते. कार्यशाळेचा विषय Teachers training program on Climate Education and Green campus Program for Safer Planet हा होता. या कार्यशाळेस श्री. गणेश सातव हे प्रमुख वक्ते म्हणुन लाभले. श्री. गणेश सातव यांनी मानवी हस्तक्षेपामुळे होणारे पर्यावरणतील बदल, त्यामुळे होणारा जैवविविधतेचा ह्रास, पर्यवारण असंतुलनाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यावर सखोल माहिती दिली. तसेच त्यांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी दैनंदिन सवयीतून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली. पर्यावरण संतुलनाची सुरवात आपण स्वतः पासून केली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षक व विद्यार्थी यांनी महाविद्यालय परिसरातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.या कार्यशाळेस महाविद्यालय

Millet Rally 2023 By department of Botany

Image
  Millet Rally 2023 On occasion of International year of Millets under Dattajirao Kadam Aart Commerce and Science College Ichalkaranji,department of Botany have organized the Millet awareness rally.The inauguration of Millet Rally was done by Principal Dr.Anil Patil sir The rally were started from D.K.A.S.C college campus to Shikshan maharshi Dr.Bapuji salunkhe Highschool, Ichalkarangi.During rally students announced the several Millet awareness slogens.After entering rally in highschool campus,our head of department,Dr. S.T.Ingle sir have put a speech on importance of Millets in our diet, during this time preface were given by Dr.Sarika Patil and vote of thanks were put by Dr.M.Y.Shinde.The rally programme done successfully due to active participation of all Botany staff members and students.

Exhibition - Best from waste

Image
  डि. के. ए. एस. सी. काॅलेजमध्ये वनस्पती शास्त्र विभागातर्फे ' बेस्ट फ्रॉम वेस्ट'   डि. के. ए. एस. सी. काॅलेज, वनस्पती शास्त्र विभागातर्फे पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचा विषय *Best From Waste* हा होता. प्रा. डि. ए. यादव सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला परीक्षक म्हणून  प्रा. डॉ. रुपाली सांभारे व प्रा. भारती कोळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ एस.टी. इंगळे यांनी टाकाऊ पासून टिकाऊ बद्दल माहिती सांगुन मार्गदर्शन केले. बी. एस सी.भाग१ आणि बी. एस सी.भाग२ मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक कु.अभिलाषा कोरे व सूत्रसंचालन कु.राजनंदिनी माने यांनी केले. कार्यक्रमास सौ.भारती दोपारे, डॉ.मधुमती शिंदे, डॉ.आम्रपाली कट्टी, डॉ.संदीप गावडे,डॉ.उदयसिंह देसाई, कु. आरती खोत, सौ.उर्मिला चौगुले,  डॉ.वर्षा दवंडे, डॉ.लीना खाडे, डॉ. संदीप गावडे, श्री.भारत देसाई, श्री.जोग व श्री.कांबळे आदी उपस्थित होते.आभार कु गायत्री साळुंखे  यांनी केले.

'पोस्टर प्रदर्शन' Women Botanist

Image
  डि. के. ए. एस. सी. काॅलेजमध्ये वनस्पतीशास्त्र विभागातर्फे 'पोस्टर प्रदर्शन' Women Botanist डि. के. ए. एस. सी. काॅलेज, वनस्पती शास्त्र विभागातर्फे पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचा विषय *Women Botanist* हा होता. डाॅ. सुनिता वेल्हाळ या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर प्रा. डी. ए. यादव सर प्रमुख उपस्थिती म्हणून होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ एस.टी. इंगळे यांनी विविध क्षेत्रात कार्यरत महिला वनस्पतीशास्त्रज्ञां बद्दल माहिती सांगुन मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कु.राजनंदिनी माने  तर आभार कु. गायत्री साळुंखे यांनी केले. कार्यक्रमास सौ.बी.एस.दोपारे मॅडम, डॉ. यु.ए.देसाई, डॉ. मधुमती शिंदे, डॉ. आम्रपाली कट्टी, कु.आरती खोत,सौ. उर्मिला चौगुले,  डॉ.वर्षा दवंडे,  डॉ. संदीप गावडे, डॉ.लीना खाडे श्री.बी.बी.देसाई,  श्री. व्हि. एस. जोग व सुनील कांबळे आदी उपस्थित होते.बी. एस सी.भाग १ आणि २ मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023

Image
  डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 साजरे करण्यात आले. 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याच्या भारत सरकारच्या ठरावाला 72 देशांनी समर्थन दिले होते. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने त्याचा स्वीकार करून 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' म्हणून घोषित केले आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाने भरड धान्य आणि त्याचे आहारातील महत्व समजावून सांगण्याच्या उद्देशाने भित्ति पत्रिका प्रदर्शन व व्याख्यान आयोजित केले. भरड धान्य हे आपल्या स्वदेशी अन्न प्रणालीतील महत्त्वाचे अन्नधान्य आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षामुळे, जागतिक स्तरावर भरड धान्याचे उत्पादन वाढवणे, कार्यक्षम प्रक्रिया आणि वापर सुनिश्चित करणे, पिकांच्या वारंवारतेचा उत्तम वापर करण्याची संधी मिळणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डी. ए. यादव होते. तसेच या कार्यक्रमाला गणित विभागाचे विभागप्रमुख प्रा. मुंगारे, प्रा. डॉ. सुतार आणि भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गाणबावले आदी मान्यवर उपस्थित ह

वनस्पतीशास्त्र विभागात Eco Friendly colours चे प्रदर्शन

Image
  डी. के. ए. एस. सी. कॉलेज मध्ये वनस्पतीशास्त्र विभागात Eco Friendly colours चे प्रदर्शन इचलकरंजी येथे डी. के. ए. एस. सी. कॉलेज मध्ये वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने रंगपंचमी सणासाठी नैसर्गिक रंगाचे प्रदर्शन आज आयोजित करण्यात आले. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ.डी.सी.कांबळे सर आणि अध्यक्ष वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. टी इंगळे उपस्थित होते. नैसर्गिक रंग हे मानवास हानिकारक नसतात असे रंग हे वनस्पतींपासून तयार केले जातात. जास्वंद , गुलाब, पालक, झेंडू ,जांभूळ ,हळद , बीट, गोकर्ण अशा वेगवेगळ्या वनस्पतीं पासून आपण वेगवेगळे नैसर्गिक रंग तयार करू शकतो. कार्यक्रमादरम्यान वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस. टी. इंगळे यांनी नैसर्गिक रंग याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डाॅ. डी. सी. कांबळे सर यांनी वनस्पतीचे अनन्य साधारण महत्व तसेच त्यापासून तयार करण्यात येणारे रंग व त्यांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.इंगळे यांनी केले . सूत्रसंचालन डॉ. मधुमती शिंदेयांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. संदीप गावडे यांनी केले. सदर कार्