वनस्पतिशास्त्र विभाग आयोजित एकदिवसीय कार्यशाळा*

 वनस्पतिशास्त्र विभाग आयोजित एकदिवसीय कार्यशाळा

दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स व कॉमर्स कॉलेज इचलकरंजी येथे वनस्पतिशास्त्र विभागातर्फे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले होते. कार्यशाळेचा विषय Teachers training program on Climate Education and Green campus Program for Safer Planet हा होता. या कार्यशाळेस श्री. गणेश सातव हे प्रमुख वक्ते म्हणुन लाभले. श्री. गणेश सातव यांनी मानवी हस्तक्षेपामुळे होणारे पर्यावरणतील बदल, त्यामुळे होणारा जैवविविधतेचा ह्रास, पर्यवारण असंतुलनाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यावर सखोल माहिती दिली. तसेच त्यांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी दैनंदिन सवयीतून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली. पर्यावरण संतुलनाची सुरवात आपण स्वतः पासून केली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षक व विद्यार्थी यांनी महाविद्यालय परिसरातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.या कार्यशाळेस महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. डी. सी. कांबळे आणि श्री. डी. ए. यादव व  इतर मान्यवर उपस्थित होते.या कार्यशाळेचे आयोजन वनस्पतिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. टी. इंगळे यांनी केले, त्यांना भौतिकशास्त्र विभागाच्या प्रा.  वैशाली ढोबळे यांचे सहकार्य लाभले .  सूत्रससंचालन डॉ. सुरेखा धुमाळ आणि डॉ. केतकी पाटील यांनी केले. डॉ. मधुमती शिंदे आणि डॉ. आम्रपाली कट्टी यांनी समन्वयक म्हणुन काम पहिले त्यांना सहकारी प्रा.  भारती दोपारे, प्रा. आरती खोत, डॉ. संदीप गावडे, डॉ. लिना खाडे, डॉ. वर्षा दवंडे, डॉ. सारिका पाटील आणि  डॉ. चिराग नारायणकर यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे आभार डॉ. मधुमती शिंदे, आणि डॉ. संदीप गावडे यांनी मानले.




Comments

Popular posts from this blog

Online Teachers day