वनस्पतीशास्त्र विभागात Eco Friendly colours चे प्रदर्शन
डी. के. ए. एस. सी. कॉलेज मध्ये वनस्पतीशास्त्र विभागात Eco Friendly colours चे प्रदर्शन
इचलकरंजी येथे डी. के. ए. एस. सी. कॉलेज मध्ये वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने रंगपंचमी सणासाठी नैसर्गिक रंगाचे प्रदर्शन आज आयोजित करण्यात आले. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ.डी.सी.कांबळे सर आणि अध्यक्ष वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. टी इंगळे उपस्थित होते. नैसर्गिक रंग हे मानवास हानिकारक नसतात असे रंग हे वनस्पतींपासून तयार केले जातात. जास्वंद , गुलाब, पालक, झेंडू ,जांभूळ ,हळद , बीट, गोकर्ण अशा वेगवेगळ्या वनस्पतीं पासून आपण वेगवेगळे नैसर्गिक रंग तयार करू शकतो. कार्यक्रमादरम्यान वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस. टी. इंगळे यांनी नैसर्गिक रंग याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डाॅ. डी. सी. कांबळे सर यांनी वनस्पतीचे अनन्य साधारण महत्व तसेच त्यापासून तयार करण्यात येणारे रंग व त्यांचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.इंगळे यांनी केले . सूत्रसंचालन डॉ. मधुमती शिंदेयांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. संदीप गावडे यांनी केले. सदर कार्यक्रमास वनस्पती शास्त्र विभागातील शिक्षक प्रा. सौ भारती डोपारे, डॉ. आम्रपाली कट्टी, प्रा. उर्मिला चौगुले, डाॅ.वर्षा दवंडे ज्ञव शिक्षकेत्तर कर्मचारी व विभागातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होते.
Comments
Post a Comment