डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023

 डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 साजरे करण्यात आले.


2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याच्या भारत सरकारच्या ठरावाला 72 देशांनी समर्थन दिले होते. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने त्याचा स्वीकार करून 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' म्हणून घोषित केले आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाने भरड धान्य आणि त्याचे आहारातील महत्व समजावून सांगण्याच्या उद्देशाने भित्ति पत्रिका प्रदर्शन व व्याख्यान आयोजित केले. भरड धान्य हे आपल्या स्वदेशी अन्न प्रणालीतील महत्त्वाचे अन्नधान्य आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षामुळे, जागतिक स्तरावर भरड धान्याचे उत्पादन वाढवणे, कार्यक्षम प्रक्रिया आणि वापर सुनिश्चित करणे, पिकांच्या वारंवारतेचा उत्तम वापर करण्याची संधी मिळणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डी. ए. यादव होते. तसेच या कार्यक्रमाला गणित विभागाचे विभागप्रमुख प्रा. मुंगारे, प्रा. डॉ. सुतार आणि भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गाणबावले आदी मान्यवर उपस्थित होते. वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. टी. इंगळे हे सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी बदलती जीवनशैली, त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि भरड धान्याचे महत्व याविषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आम्रपाली कट्टी यांनी केले. आभार कु. पौर्णिमा पाटील हिने मानले. सदर कार्यक्रमास प्रा. भारती दोपारे, डॉ. मधुमती शिंदे, डॉ. लिना खाडे, डॉ. संदीप गावडे, प्रा. आरती खोत, प्रा. उर्मिला चौगुले आणि डॉ. उदयसिंह देसाई उपस्थित होते.








Comments

Popular posts from this blog

Online Teachers day