एक्झिबिशन ऑफ हर्बल प्रॉडक्ट
वनस्पतीशास्त्र विभागातर्फे एक्झिबिशन ऑफ हर्बल प्रॉडक्ट चे प्रदर्शन संपन्न
दिनांक 12 सप्टेंबर 2025.
वनस्पतीशास्त्र विभागातर्फे एक्झिबिशन ऑफ हर्बल प्रोडक्ट हा कर्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी वनस्पतीशास्त्र विभागातील बीएससी भाग तीन या विद्यार्थ्यांनी हर्बल प्रॉडक्ट तयार करून त्याचे प्रेझेंटेशन केले.
तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य प्रोफेसर (डॉ.) एस. के. खाडे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये भारतीय प्राचीन परंपरांमध्ये आयुर्वेदाचे महत्त्व आणि त्याचे उपयोग याबद्दल माहिती दिली.
तसेच तुळस, कडुलिंब, कोरफड, दुधी भोपळा यासारख्या औषधे वनस्पतीचे महत्व विशद केले.
औषधी उत्पादने नैसर्गिकपणे तयार करून तुम्ही उद्योजक बनू शकता. तसेच आजच्या धावपळीच्या आणि रसायन युक्त जीवनशैलीत लोक पुन्हा नैसर्गिक पर्यायांकडे वळत आहेत. त्यामुळे हर्बल उत्पादनाची मागणी जगभरात झपाट्याने वाढत आहे. या नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या औषधी वनस्पतीची पिके घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत.
वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. टी. इंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये आयुर्वेदाचे असणारे महत्त्व विशद केले. या आयुर्वेदामध्ये हर्बल कॉस्मेटिक्स आणि हर्बल मेडिसिन याबद्दलची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. बी. एस. दोपारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. श्रुती पाटील हिने केले.
या कार्यक्रमाच्या वेळी वनस्पती शास्त्र विभागातील डॉ. सारिका पाटील, डॉ. आम्रपाली कट्टी, डॉ. संदीप गावडे, डॉ. केतकी पाटील, डॉ. उज्वला दिवाण, डॉ. शितल कोपर्डे, डॉ. लीना खाडे, डॉ. वर्षा दवंडे तसेच श्री अतुल वाळके, श्री अंकुश गिरी यांचे सहकार्य मिळाले.
Comments
Post a Comment