फ्रेशर्स डे 2025-2026
वनस्पती शास्त्र विभागाचा फ्रेशर्स डे संपन्न दिनांक: 09/09/2025
दत्ताजीराव कदम आर्ट सायन्स व कॉमर्स महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील एम.एससी.प्रथम वर्ष च्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स डे चे आयोजन करण्यात आले होते. सन 2025- 26 साठी महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभागा त एम. एस सी. साठी प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी फ्रेशर्स डे चे आयोजन केले होते. यावेळी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुष्प व प्रेझेंट देऊन त्यांचं स्वागत केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुभाष इंगळे यांनी केले त्यांनी महाविद्यालयाच्या सुविधांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. शंकर खाडे सर होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की कठोर परिश्रमा शिवाय पर्याय नाही. आपल्या जीवनामध्ये संधीचे सोनं करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागतील. आणि वनस्पती शास्त्र विषयांमध्ये अनेक संधी आहेत परिस्थितीचा कोणताही न्यूनगंड न ठेवता, आपल्याला पुढे जायचे आहे. याप्रसंगी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार स्नेहा कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी प्रा डॉ. सारिका पाटील, डॉ. लीना खाडे , डॉ. आम्रपाली कट्टी, डॉ. दोपारे, डॉ. केतकी पाटील ,डॉ.शितल कोपारडे, डॉ दिवाण व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.यावेळी सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबा जमादार व विवेकानंद चौगुले यांनी केले.
Comments
Post a Comment