Posts

Showing posts from March, 2023

Exhibition - Best from waste

Image
  डि. के. ए. एस. सी. काॅलेजमध्ये वनस्पती शास्त्र विभागातर्फे ' बेस्ट फ्रॉम वेस्ट'   डि. के. ए. एस. सी. काॅलेज, वनस्पती शास्त्र विभागातर्फे पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचा विषय *Best From Waste* हा होता. प्रा. डि. ए. यादव सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला परीक्षक म्हणून  प्रा. डॉ. रुपाली सांभारे व प्रा. भारती कोळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ एस.टी. इंगळे यांनी टाकाऊ पासून टिकाऊ बद्दल माहिती सांगुन मार्गदर्शन केले. बी. एस सी.भाग१ आणि बी. एस सी.भाग२ मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक कु.अभिलाषा कोरे व सूत्रसंचालन कु.राजनंदिनी माने यांनी केले. कार्यक्रमास सौ.भारती दोपारे, डॉ.मधुमती शिंदे, डॉ.आम्रपाली कट्टी, डॉ.संदीप गावडे,डॉ.उदयसिंह देसाई, कु. आरती खोत, सौ.उर्मिला चौगुले,  डॉ.वर्षा दवंडे, डॉ.लीना खाडे, डॉ. संदीप गावडे, श्री.भारत देसाई, श्री.जोग व श्री.कांबळे आदी उपस्थित होते.आभार कु गायत्री साळुंखे  यांनी केले.

'पोस्टर प्रदर्शन' Women Botanist

Image
  डि. के. ए. एस. सी. काॅलेजमध्ये वनस्पतीशास्त्र विभागातर्फे 'पोस्टर प्रदर्शन' Women Botanist डि. के. ए. एस. सी. काॅलेज, वनस्पती शास्त्र विभागातर्फे पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचा विषय *Women Botanist* हा होता. डाॅ. सुनिता वेल्हाळ या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर प्रा. डी. ए. यादव सर प्रमुख उपस्थिती म्हणून होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ एस.टी. इंगळे यांनी विविध क्षेत्रात कार्यरत महिला वनस्पतीशास्त्रज्ञां बद्दल माहिती सांगुन मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कु.राजनंदिनी माने  तर आभार कु. गायत्री साळुंखे यांनी केले. कार्यक्रमास सौ.बी.एस.दोपारे मॅडम, डॉ. यु.ए.देसाई, डॉ. मधुमती शिंदे, डॉ. आम्रपाली कट्टी, कु.आरती खोत,सौ. उर्मिला चौगुले,  डॉ.वर्षा दवंडे,  डॉ. संदीप गावडे, डॉ.लीना खाडे श्री.बी.बी.देसाई,  श्री. व्हि. एस. जोग व सुनील कांबळे आदी उपस्थित होते.बी. एस सी.भाग १ आणि २ मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023

Image
  डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 साजरे करण्यात आले. 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याच्या भारत सरकारच्या ठरावाला 72 देशांनी समर्थन दिले होते. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने त्याचा स्वीकार करून 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' म्हणून घोषित केले आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाने भरड धान्य आणि त्याचे आहारातील महत्व समजावून सांगण्याच्या उद्देशाने भित्ति पत्रिका प्रदर्शन व व्याख्यान आयोजित केले. भरड धान्य हे आपल्या स्वदेशी अन्न प्रणालीतील महत्त्वाचे अन्नधान्य आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षामुळे, जागतिक स्तरावर भरड धान्याचे उत्पादन वाढवणे, कार्यक्षम प्रक्रिया आणि वापर सुनिश्चित करणे, पिकांच्या वारंवारतेचा उत्तम वापर करण्याची संधी मिळणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डी. ए. यादव होते. तसेच या कार्यक्रमाला गणित विभागाचे विभागप्रमुख प्रा. मुंगारे, प्रा. डॉ. सुतार आणि भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गाणबावले आदी मान्यवर उपस्थित ह

वनस्पतीशास्त्र विभागात Eco Friendly colours चे प्रदर्शन

Image
  डी. के. ए. एस. सी. कॉलेज मध्ये वनस्पतीशास्त्र विभागात Eco Friendly colours चे प्रदर्शन इचलकरंजी येथे डी. के. ए. एस. सी. कॉलेज मध्ये वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने रंगपंचमी सणासाठी नैसर्गिक रंगाचे प्रदर्शन आज आयोजित करण्यात आले. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ.डी.सी.कांबळे सर आणि अध्यक्ष वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. टी इंगळे उपस्थित होते. नैसर्गिक रंग हे मानवास हानिकारक नसतात असे रंग हे वनस्पतींपासून तयार केले जातात. जास्वंद , गुलाब, पालक, झेंडू ,जांभूळ ,हळद , बीट, गोकर्ण अशा वेगवेगळ्या वनस्पतीं पासून आपण वेगवेगळे नैसर्गिक रंग तयार करू शकतो. कार्यक्रमादरम्यान वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस. टी. इंगळे यांनी नैसर्गिक रंग याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डाॅ. डी. सी. कांबळे सर यांनी वनस्पतीचे अनन्य साधारण महत्व तसेच त्यापासून तयार करण्यात येणारे रंग व त्यांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.इंगळे यांनी केले . सूत्रसंचालन डॉ. मधुमती शिंदेयांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. संदीप गावडे यांनी केले. सदर कार्