*डी.के.ए.एस्.सी.कॉलेजमध्ये वनस्पतीशास्ञ विभागामार्फत व एन्.सी.सी विभागामार्फत चंदूर परिसरात -वृक्षारोपण कार्यक्रम* कॉलेजचे माननीय प्राचार्य डॉ.आर्.आर्.कुंभार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.वृक्षारोपण हा केवळ एक कार्यक्रम नाही सृष्टी, विश्व वाचवण्याचा उपक्रम आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षांची भूमिका महत्त्वाची असून यासाठी वृक्ष लागवड हाच पर्याय आहे.असा संदेश प्रा.डॉ.विजयकुमार पाटील यांनी याप्रसंगी दिला. प्रा.डॉ.एस्.टी.इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला उपक्रम,त्यासाठी चंदूर गावचे सरपंच उदय गिते, एम्.जे.वीरकर सर,आकाश बनसोडे, रजिस्टार लोकरे सर प्रा.मधुमती शिंदे ,प्रा.दोपारे,प्रा.कट्टी,प्रा.खोत, प्रा.हिरणेकर ,वनस्पतीशास्ञ विभाग बी.एस्सी.३चे सर्व विद्यार्थी व एन्.सी.सी.सर्व विद्यार्थीआदि उपस्थित होते.