जागतिक पाणथळ दिवस

 जागतिक पाणथळ दिवस      [दि.02/02/2021]


  










दत्ताजीराव कदम AScकॉलेज च्या वतीने जागतिक पाणथळ दिवस साजरा करण्यात आला .दिनांक 2 फेब्रूवारी जागतिक पाणथळ दिवस साजरा करण्यात येतो या अनुषंगाने महाविद्यालयातील P G Department of botany च्या वतीने आज जागतिक पाणथळ दिवसाचे आयोजन करण्यात आले होते .या प्रसंगी महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य व्ही .एस .ढेकळे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते .तर यावेळी प्रा. डॉ.एस.टी.इंगळे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.यावेळी डाॅ. प्रा . इंगळे म्हणाले save our wetland हे ब्रिद घेऊन बुद्धीजिवी वर्गाने समजात प्रबोधन करणे गरजेचे आहे तसेच ramsar wetland च्या नामांकनात नांदुर मदमेश्वर याचा समावेश झाल्याबद्दल आपल्यासाठी भूषणावह बाब आहे .तसेच प्रा.डॉ.ढेकळे सर म्हणाले पाणथळ जागांचे संरक्षण व संवर्धन करून आपण शाश्वत विकास करण्यास मदत करू शकतो . तरी हे आपले प्रथम कर्तव्य आहे.पाणथळ जागांचा शोध घेऊन त्याचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे आहे .या कार्यक्रमाचे संयोजन डॉ.लीना खाडे ,डॉ.वर्षा दवंडे ,डॉ.सुरेखा   धुमाळ यांनी केले .तसेच m.sc भाग 1 च्या विध्यार्थिनी शुभांगी कुह्राडे ,अनिता चौगुले यांनी पाणथळ जागांचे महत्व व माहिती समजून घेतली 

सुत्रसंचालन - रूबी मित्तल

आभार प्रदर्शन - सुधा नलवडे

Comments

Popular posts from this blog

Online Teachers day