Online Teachers day
*दत्ताजीराव कदम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इचलकरंजी, वनस्पतीशास्ञ विभागांमार्फत अॉनलाईन शिक्षक दिन साजरा*
भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन
यांच्या जन्मदिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यंदा शिक्षण ऑनलाइन सुरू असल्यामुळे या विशेष दिवसावर देखील करोनाचे सावट आहे. पण तरीही मुलांनी हा दिवस साजरा केला. त्यानुसार, कु.श्रुती खोत आणि कु.सुप्रिया माळी यांनी आॉनलाईन पद्धतीने लेक्चर घेतले.ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्यात परिवर्तन आणले अशा शिक्षकांचे आभार आणि आपल्या आवडत्या शिक्षकांबद्दलच्या भावना कु.मेघा परिट,कु.अमृता चौगुले व उर्मिला इंगवले या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी अध्यक्ष विभाग प्रमुख प्रा.डॉ.व्ही.ए.पाटील होते.प्रा.एस्.टी.इंगळे,प्रा.दोपारे, प्रा.मधुमती शिंदे. प्रा.डॉ.आम्रपाली कट्टी, प्रा.आरती खोत यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
स्वागत कु.सरिता बावचे तसेच प्रास्तविक प्रा.सोनाली शिंदे यांनी केलं.कु.शलाका मुठाणे यांनी आभार मानले.अशा आॕनलाईन कार्यक्रमाचे नियोजन अभिषेक कांबळे व रोहन बुबने यांनी केले.याप्रसंगी वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
So sweet moments 😍
ReplyDeletenice activity
ReplyDeleteA college with different activities.... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete