Posts

Showing posts from September, 2023

"भरडधान्य पाक-कला प्रदर्शन"

Image
 *"भरडधान्य पाक-कला प्रदर्शन"* श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे, दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्य ॲण्ड कॉमर्स कॉलेज इंचलकरजी येथे वनस्पतीशास्त्रा विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी "भरडधान्य पाककला प्रदर्शन" घेण्यात आले. या मध्ये मुलांना  भरडधान्याची  ओळख व्हावी व त्यांचे महत्व समजावे म्हणून बाजरी, नाचणी,रागी, राळे, वरी यापासून पारंपारिक व आधुनिक काही पाककृती  समजाव्यात यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुण्या सौ. मोशमी आवाडे व सौ. अस्मीता आमणे यांनी मुलांचे कौतुक करत त्यांना भविष्यासाठी मार्गदर्शन केले व भरडधान्य चे महत्व त्यांच्या मनात रुजवले. त्याचबरोबर महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अनिल  पाटील सर यांनी ही मुलाचे कौतूक केले व शुभेच्छा दिल्या.वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व सहकार्यांचे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.  सर्व विद्यार्थ्यांनी 75 पाककृती करून छान छान आकर्षक सजावट करून ठेवल्या होत्या. या कार्यक्रमाचे संयोजक व विभागप्रमुख डॉ. सुभाष इंगळे सर यांनी केले.  सुत्रसंचालन डॉ. मधुमती शिंदे व कु. आरती खोत यांनी केले व...

एम्. एस्सी. भाग १ स्वागत समारंभ आणि एम्. एस्सी. भाग २ चा निरोप समारंभ

Image
वनस्पतीशास्त्र विभागात नवागतांचे एम्. एस्सी. भाग १ स्वागत समारंभ आणि एम्. एस्सी. भाग २ चा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स and काॅमर्स काॅलेज इचलकरंजी वनस्पतीशास्त्र विभागात नवागतांचे  स्वागत समारंभ व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. स्वागत समारंभास प्रमुख पाहुणे आपल्या काॅलेज प्राचार्य डॉ.अनिल पाटील सर,उपप्राचार्य श्री. डी. ए. यादव सर, अध्यक्ष स्थानी विभागप्रमुख डाॅ. एस्. टी. इंगळे सर यांची उपस्थिती लाभली. समारंभास आपल्या काॅलेज चे लाडके प्राचार्य डॉ. अनिल पाटील सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. समारंभ दरम्यान श्री. यादव सर व डाॅ. इंगळे यांनी विद्यार्थी विद्यार्थीनींना आपल्या काॅलेज ची माहिती दिली व मार्गदर्शन केले. एम्. एस्सी. भाग 1  आणि बएम्. एस्सी. भाग 2 शिक्षण पुर्ण झालेल्या माजी विद्यार्थी विद्यार्थीनी चा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थी  विद्यार्थीनींनी आपली मनोगतं मांडली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. श्रद्धा पाटील व कु. जान्हवी शिंदे  यांनी केले. आभार प्रदर्शन करु.पौर्णिमा पाटील यांनी केले. य...