वनस्पतीशास्ञ विभागामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त व्याख्यानाचे आजोजन
* वनस्पतीशास्ञ विभागामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त व्याख्यानाचे आजोजन* 🌻🌱🌻🌱🌻🌱🌻🌱 इचलकरंजी - येथील डी. के. ए. एस. सी.कॉलेजमध्ये *राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त* वनस्पतीशास्त्र विभाग ,सायन्स असोसिएशन व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्यावतीने *प्रा.शेखर ए.मोहिते सर* यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रा.शेखर मोहिते म्हणाले ,“UNESCO World Natural Heritage Site”समाविष्ट असे *कास पठार* विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. येथील जैवविविधता व पठारावर फुलणाऱ्या दुर्मीळ फुलांना टिकवायचे असेल तर कास पठाराचे संवर्धन होणे गरजेचे आहे.त्याचे सखोल शास्त्रीय संशोधन आणि डोळस संरक्षण व्हायला हवे. अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य *डॉ. व्ही.एस.ढेकळे* यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,तसेच कास पठार हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे व त्याचे संवर्धन करणे आपणा सर्वांचे कर्त्यव्य आहे,असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांचा परिचय वनस्पती शास्ञ विभागप्रमुख डॉ.एस्. टी.इंगळे यांनी करून दिल...