Posts

Showing posts from November, 2022

डी. के. ए. एस. सी. कॉलेज मध्ये वनस्पती विभागात संविधान दिन साजरा

Image
*डी. के. ए. एस. सी. कॉलेज मध्ये वनस्पती शास्त्र  विभागात संविधान दिन साजरा* इचलकरंजी येथे डी. के. ए. एस. सी. कॉलेज मध्ये वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने संविधान दिन खुप उत्साहाने साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. टी इंगळे यांनी संविधान दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले,तसेच संविधानाचे निर्माते भारतीय राज्यघटनेचे * शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर * यांनी संविधान निर्मितीसाठी केलेल्या कार्याची माहिती सांगितली. भारत हा धर्मनिरपेक्ष, सार्वभौम, समाजवादी देश आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा विविध भाषा, विविध धर्म, विविध संस्कृती असणारा देश असूनही भारतीय संविधानामुळे तो आजही एकसंघ आणि एकात्म राहिलेला आहे. स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय ही मुलतत्वे भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आहेत. भारतातील प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि समान न्याय भारतीय संविधानाने दिलेले आहे. तसेच कुठल्याही प्रकारची विषमता आणि असमानता भारतीय संविधानाला मान्य नाही, आपण सर्व प्रथम भारतीय व अंतिमतः भारतीयच असू ही शिकवण घटनेच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब ...